Home | International | Other Country | Shocking : A bullet in the back for raping a boy, Two pedophiles are publicly executed in Yemen for raping and murdering a 12 year old

मुस्लिम देशात जवानांनी हजारो लोकांसमोर दोघांना घातल्या गोळ्या; दोषींना मिळाली त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 10, 2019, 03:00 PM IST

आरोपींनी 12 वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करुन त्याच्यावर बलात्कार केला होता.

 • Shocking : A bullet in the back for raping a boy, Two pedophiles are publicly executed in Yemen for raping and murdering a 12 year old

  एडन- यमनमध्ये एका चिमुरड्यावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याची घटना उघड आहे. या गुन्ह्याखाली दोन आरोपींना अटक झाली असून त्यांना सर्वांसमोर गोळी घालुन मारण्याची शिक्षा सुनवण्यात आली आहे. या प्रकरणात शरीया अदालतने एका महिलेलादेखील मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. परंतू ती प्रग्नेंट असल्यामुळे तिची शिक्षा टाळण्यात आली आहे. वादाह रफत (वय 29) आणि मोहम्मद खालिद (वय 31) असे या आरोपींचे नाव असून त्यांनी एका 12 वर्षीय चिमुरड्यावर बलात्कार करुन हत्या केली होती. त्यानंतर मिलिट्रीच्या जवानांनी त्यांना ही शिक्षा दिली.

  शरीयाच्या कायद्याअंतर्गत सुनवण्यात आली शिक्षा...
  गतवर्षीच्या मे महिन्यात यमनची राजधानी एडनमध्ये ही घटना घडली होती. तिथे आरोपी रफत आणि खालिद यांनी घरासमोर खेळणाऱ्या 12 वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करुन त्याला एका घरात डांबून ठेवले होते. तिथे त्यांनी चिमुरड्यावर अत्याचार करुन त्याची गळा चिरुन हत्या केली होती. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने त्यांनी चिमुरड्याचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ही घटना उघड येताच पोलिसांनी त्यांना बेड्या घालून कोर्टासमोर उभे केले होते.

  कोर्टाने दोघा आरोपींना बलात्कार आणि हत्याच्या गुन्ह्याखाली आणि त्या दोघांना मदत करण्याच्या गुन्ह्याखाली महिलेला मृत्यूची शिक्षा सुनावली होती. परंतू आरोपी महिला प्रेग्नेंट असल्यामुळे कोर्टोने तिची शिक्षा टाळली आहे.

  आरोपींना सर्वांसमोर गोळी घालून मारण्याची शिक्षा सुनावताच मिलिट्री जवानांनी त्यांना गोळी घातली होती. त्यावेळी ही घटना पाहण्यासाठी हजारो लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

 • Shocking : A bullet in the back for raping a boy, Two pedophiles are publicly executed in Yemen for raping and murdering a 12 year old
 • Shocking : A bullet in the back for raping a boy, Two pedophiles are publicly executed in Yemen for raping and murdering a 12 year old

Trending