आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी शहरात एक रिव्हाल्वर आणि तीन जिवंत काडतूसांसह दोनजण ताब्यात   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- येथील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका दोन व्यक्तींकडून एक रिव्हाल्वरासह तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहे. परळी शहरात आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलिसांना एक व्यक्ती संशारसापदीरित्य आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एका रिव्हाल्वरासह तीन जिवंत काडतुस अढळून आले.
मिळालेली माहिती अशी की, आज(रविवार) दुपारी 12 वाजन्याच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की,  परळी येथील जुने कोर्ट अवारात दोन इसम थांबले असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. बातमी मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस उपनिरीक्षक चांद मेंढके, पो. हे. काॅ बांगर आणि तोटेवाड  तातडीने जुन्या कोर्टाच्या अवारात गेले. तिथे पोलिसांनी आरोपी वैजनाथ आनंद आलदे, (वय 43 रा.विद्यानगर परळी वैजनाथ) आणि  संजय चंद्रकांत पाथरकर (वय 49 रा. गणेशपार परळी वैजनाथ) यांना ताब्यात घेतले.
संजय चंद्रकांत पाथरकर, यांच्या कमरेला आतून ठेवलेला एक गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. त्यांच्यावर कलम 3,25 26, भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 म.पो. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...