आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव टिप्परची धडक; दुचाकीवरील दांपत्य ठार; टिप्पर चालक दारू प्यायलेला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाल्याची घटना जालना-भोकरदन रोडवरील गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी खत कारखान्यासमोर सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. योगेश गणेश बोडखे (२५, जानेफळ मिसाळ ता. भोकरदन), गीता योगेश बोडखे (२०) अशी मृत पती-पत्नीचे नावे आहेत. 
योगेश बोडखे हे आपल्या सहा महिन्यांची गरोदर  पत्नी गीता यांची जालना येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून दुचाकीने (एमएच-२१,एजे- ५०६४)  जानेफळकडे जात होते. दरम्यान, घाणेवाडीकडून जालन्याकडे गाळ घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने (एमएच-१८, एम-५०२३) दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर हा टिप्पर राजलक्ष्मी कारखान्याच्या भिंतीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीवरील योगेश बोडखे हे जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या गरोदर गीता बोडखे यांना प्रारंभी जालना येथे प्राथमिक उपचार करून औरंगाबादला हलवले जात  असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचारी अनिल काळे, भरत कडूळे, कृष्णा भडंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन टिप्परचालकास  ताब्यात घेतले. हा टिप्पर चालक  मद्य प्राशन करून वाहन चालवत होता, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.