आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दहा हजारांसाठी तरुणाच्या डोक्यात घातला २० किलो वजनी दगड, दोन संशयितांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - लायटिंगच्या व्यवसायातून ३५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये बाकी असल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये वाद झाले. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दोघांनी तरुणाच्या घरी जाऊन बाहेर बोलावले. घरापासून काही अंतरावर नेऊन त्याला बेदम मारहाण केली. दोघांनी पाच वेळा वीस किलो वजनाचा दगड तरुणाच्या डोक्यात घालून हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री ईश्वर कॉलनीत घडली. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. घनश्याम शांताराम दीक्षित (३७, रा. ईश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर सनी ऊर्फ चालीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) व मोहिनीराज ऊर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेलच्या मागे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अटकेतील मोहिनीराज व सनी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी मुन्ना हा लायटिंग, इलेक्ट्रिकचा व्यवसाय करीत असताना त्याने दीक्षित यांच्या सांगण्यावरून लायटिंग टाकून दिली. त्याचे बिल ३५ हजार रुपये झाले होते. त्यातील २५ हजार रुपये त्यांनी परत केले, तर उर्वरित १० हजार रुपये बाकी होते. शनिवारी रात्री दीक्षित हे सुधीर महाले या तरुणासह बिअरबारमध्ये बसले होते. या वेळी मुन्ना व जयंत पाटील नावाचा तरुण हॉटेलात आले. आपल्या टेबलवर येऊन बसा, असा आग्रह दोघांनी एकमेकांना केला. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्या नंतर सनी व मुन्ना दोघे रात्री दीक्षित यांच्या घरी गेले.
 

जमिनीच्या व्यवहारातून घटना घडल्याचा संशय
१० हजार रुपयांच्या उधारीतून झालेल्या वादामुळे श्यामचा खून केला, असा कबुलीजबाब अटकेतील मुन्ना व सनी यांनी दिला आहे. प्रत्यक्षात हा खून जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. दीक्षित हे तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस येथे नागरिकांची कामे करीत होते. सेतू सुविधा केंद्राचे कामही करीत होते. तसेच मालमत्ता खरेदी-विक्रीचाही व्यवसाय होता.
 
 

बातम्या आणखी आहेत...