आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईत स्कोडाने दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवले, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कामोठे शहरातील अंदर्गत रस्त्यावर भरधाव स्कोडाने दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. रविवारी (21 जुलै) संध्याकाळी रस्त्यावर गर्दीच्यावेळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. 

 


गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे चालकाने सुरुवातीला डाव्या बाजूच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर विरुद्ध दिशेने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना उडवले. चार दुचाकींना धडक देत आणि पादचाऱ्यांना उडवत स्कोडाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसलाही धडक दिली. हा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला. 


या अपघातात सार्थक चोपडे (वय 7 वर्षे) आणि वैभव गुरव (वय 32 वर्षे)  या दोघांचा मृत्यू झाला. तर मृत सार्थकची आई साधना चोपडे (30 वर्ष), श्रद्धा जाधव (वय 31 वर्ष), आशिष पाटील, प्रशांत माने आणि एक सोळा वर्षीय मुलगी जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.