आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकअप व्हॅन आणि टँकरची समोरसमोर भीषण धडक, अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला

एरंडोल- एरंडोलपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील पातरखेडे ते तुराटखेडे दरम्यान टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली पीकअप व्हॅन आणि टँकरची समोरासमोर भीषण धडक झाली. मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात जळगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

कास्टिक सोड्याची वाहतूक करणारे टँकर (क्रमांक एमएच.48-जे.0522) धुळ्याकडून जळगावकडे येत होते. तर (एमएच-15-एफव्ही.2381) क्रमांकीची पीकअप व्हॅन धुळ्याकडे जात होती. एरंडोलपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर पातरखेडे ते तुराटखेडे दरम्यान पांडुरंग मराठे यांच्या शेताजवळ पिकअपचे पुढील टायर अचानक फुटले. यामुळे पीकअप व्हॅन समोरील टँकरवर आदळली. या अपघातात पीकअपमधील दोन जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय 32, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) आणि शेख इक्बाल शेख ताहेर मन्यार (वय 27, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे नातेवाईक असल्याचे माहिती आहे. दरम्यान, या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही मृतदेह पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.