आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस. टी. बसवर ट्रक आदळून दोन जण झाले गंभीर जखमी; ट्रकमधील संपूर्ण कांदा अस्ताव्यस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- अनभोरा गावालगत कुष्ठग्राम नजीक वळणावर एसटी बसवर ट्रक आदळल्याने चालकासह एक प्रवासी जखमी झाल्याची घटना ५ डिसेंबरला घडली. राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावर कारंजावरून बुलडाण्याकडे जाणारी बस क्र.एम.एच.४०/ ५९११ विरुद्ध दिशेने नाशिक येथून कांदा भरून नागपूरकडे जात असलेला ट्रक क्र.एम.एच.१९/ ९५९५ हा एसटी बसवर आदळल्याने बसचालक मो. अनवर मो. अकबर (४५), कारंजा येथील एक प्रवासी जखमी झाला. 

 

या अपघातात ट्रक बसवर आदळून रोडवर आडवा होऊन संपूर्ण कांदा अस्ताव्यस्त झाला, तर एसटी बसची केबिन चुराडा झाली. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर डेपो मॅनेजर प्रवीण अंबुलकर, कारंजा आगाराचे अनिल मानके, विभागीय यंत्र अभियंता गाडबैल, विभागीय वाहतूक अधीक्षक ठाकरे, बँक संचालक विजय साबळे, संतोष घोगरे, गणेश घाटे, पांडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...