आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत १८ लाखांचा गुटखा जप्त दोन जण अटकेत, सूत्रधार फरार; मध्य वस्तीत होते गोदाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मध्यवस्तीतील गोलघुमट जवळील रोशन खान मोहल्ला या परिसरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी(दि.२८) शुक्रवारी पहाटे एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा १८ लाख रुपयांचा साठा जप्त केला. तसेच दोघांना अटक केली. 


गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित अन्न साठ्याविरुद्ध जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली.   या मोहिमेने बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांत मोठी खळबळ उडाली. काहींनी या मोहिमेतून सुटका व्हावी म्हणून जिल्ह्यातून पोबाराही केला. परंतु पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांची पाळेमुळे खणून काढली आहेत.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास गोलघुमट जवळील रोशन खान मोहल्ला परिसरात तीन मजली इमारतीतील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती कळाली. पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने शुक्रवारी पहाटे तीन वाजता तेथे छापा टाकला. शेख रफीक अहेमद मकसूद अहेमद व शेख शफिक अहेमद शेख रफिक अहेमद या पिता पुत्रांनी या इमारतीतील तळमजल्यावरील एक दुकान मोहम्मद कलीम मोहम्मद युसूफ व सय्यद सईस सय्यद इलियास यांना  दिले होते.   


प्रतिबंधित खाद्य वस्तूंचा साठा : अन्न सुरक्षा अधिकारी पी.सी.कच्छवे यांना घटनास्थळी पाचारण केले तेव्हा सिग्नेचर फायनेस्ट पान मसाला, विनालेबल सुगंधित तंबाखू, रत्नाछाप नं ३०० सुगंधित तंबाखू, वाणी सुगंधित तंबाखू, ओरिजनल केसर युक्त प्रीमियम पान मसाला, रत्नाछाप नं ३००० सुगंधित तंबाखू, बाबा २७० सुगंधित तंबाखू, हॉट प्रीमियम पान मसाला, एच-५ प्रीमियम च्युइंग टोबॅको, दिलबाग प्लस पान मसाला आदी प्रतिबंधित वस्तूंचा साठा आढळून आला.   साठ्याची एकूण किंमत १८ लाख ३० हजार ८६८ रुपये एवढी आहे.  या पथकाने शेख शफिक अहेमद रफीक अहेमद, सय्यद रईस सय्यद इलियास या दोघांना ताब्यात घेतले व नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्न सुरक्षा अधिकारी कच्छवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. शेख रफीक अहेमद मकसूद अहेमद आणि मोहम्मद कलीम फरार आहेत. 
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार लक्ष्मीकांत धुतराज, संजय शेळके, निळोबा मुंंडे, आशा सावंत, शिवदास धुळगुंडे, हरिश्‍चंद्र खुपसे, रवी कटारे आदींनी या कारवाईत सहभाग नोंदवला. दरम्यान, या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक सचिन द्रोणाचार्य अधिक तपास करीत आहेत. 

 

मोहम्मद कलीम मुख्यसूत्रधार
या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यात शेख रफीक अहेमद मकसूद अहेमद, आणि मोहम्मद कलीम या दोघांचा सहभाग आहे. मोहम्मद कलीम हा  मुख्य सूत्रधार आहे. त्याचे नारायणचा भागात जर्दाचे दुकान आहे. दरम्यान, मोहम्मद कलीम याच्या अटकेकरिता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पथके रवाना केली आहेत.