आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Persons Claim Ownership Of The Dog, Police Handed Over Puppy Who Sworn To Tree Dog

दोन व्यक्तींनी कुत्र्यावर बजावला मालकी हक्क, पोलिसांनी पिंपळाची शपथ घेणाऱ्याकडे सुपूर्द केला कुत्रा    

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद - हरियाणातील फतेहाबाद येथे एक वेगळीच घटना घडली. एका कुत्र्यावरील मालकी हक्काबाबत दोन लोक आपापसांत भिडले. यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिस स्टेशनमध्ये दोन तास झालेल्या वाद-विवादानंतरही कुत्र्याचा खरा मालक कोण हे निश्चित झाले नाही. खऱ्या मालकाची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी कुत्र्याची परीक्षा घेतली. परंतु यानंतरही त्याच्या खऱ्या मालकाचा पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांनी पंचायतीसमोर पिंपळाची शपथ घेणाऱ्याकडे कुत्रा सुपूर्द केला.एसएचओ यादविंद्र सिंह यांनी सांगितले की, आम्ही मालकाचा ओळख पटण्यासाठी कुत्र्याची एक परिक्षा घेतली. दोन्ही दावेदारांना समोर बसवून कुत्र्याला त्यांच्याकडे सोडले. मात्र कुत्रा दोघांकडेही गेला. यामुळे कुत्र्याचा खरा मालक कोण हे तपासणे अधिक कठीण काम झाले होते.

दोन्ही मालकांनी मांडले आपापले दावे 


पोलिसांनुसार, डीएव्ही शाळेजवळ भोडियाखेडा रोडवर राहणाऱ्या अनिल कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, 6 दिवसांपूर्वी काठमंडी येथील प्रवीण याने गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्याला उचलुन नेले. तर प्रवीणने दावा केला की, आठ महिन्यांपूर्वी त्याचा कुत्रा हरवला होता. तो हाच आहे.पिंपळाची शपथ घेणाऱ्याकडे सुपूर्द केला कुत्रा


कुत्र्याचा परिक्षेनंतर प्रवीण त्यावर सहमत नव्हता. तेव्हा जर प्रवीणने पिंपळाची शपथ घेतली तर तो कुत्रा घेऊन जाऊ शकतो असे अनिल म्हणाला. यानंतर प्रवीणने पंचायतीसमोर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत शपथ घेतली आणि कु्त्रा घेऊन गेला. 

बातम्या आणखी आहेत...