आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूरच्या देवीची ज्योत घेऊन पायी निघालेल्या नाशिकच्या भाविकांना कंटेनरने चिरडले, दोन जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - तुळजाभवानी देवीची ज्योत घेऊन पायी निघालेल्या नाशिक येथील दहा भक्तांना नांदूर शिंगोटे बायपास येथे ट्रकने चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर 8 जण जखमी आहेत. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहेत. 


नाशिक येथील भाविक नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन पायी निघाले होते. शिंगोटे बायपासजवळ आले असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर भाविकांत घुसला आणि कंटेनरने त्यांना उडवले. मध्यरात्रीनंतर 1 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पायी जाणाऱ्या 10 भाविकांपैकी 2 जण जागीच ठार झाले तर 8 जण जखमी आहेत. आकाश बोकड (22, सांजेगाव), बबन रवंदाळे (लहांगे) अशी मृतांची नावे आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...