Maharashtra Crime / कारवाई न करण्यासाठी लाच म्हणून रक्कम आणि शरीर सुखाची मागणी, नागपुरातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक

एसीबीने या दोघांना सापळ्यात अडकवून अटक केली

प्रतिनिधी

Sep 03,2019 11:33:00 PM IST

नागपूर- ब्युटी पार्लर आणि स्पाच्या मालकीणवर एमपीडिएची कारवाई न करण्यासाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी 25 हजार रुपयांच्या लाचेसह शरीर सुखासाठी 3 तरुणींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोघे कर्मचारी नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा सेलचे कर्मचारी असून एसीबीने या दोघांना सापळ्यात अडकवून अटक केली.


लाच आणि शरीर सुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे सहायक उपनिरीक्षक दामोदर राजूरकर (वय 56) आणि पोलिस हवालदार शितलाप्रसाद मिश्रा (वय 51) अशी आहेत. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. अमरावती मार्गावरील एका ब्युटी पार्लरवर अनैतिक प्रकारांच्या संशयावरुन मागील दोन वर्षात गुन्हे शाखेने तीनदा छापे घालून कारवाई केली होती. या पार्लरच्या मालकीनीवर एमपीडिएची कारवाई न करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा ब्रँचचे कर्मचारी राजूरकर आणि मिश्रा यांनी 25 हजार रुपये आणि शरीर सुखासाठी 3 तरुणींची मागणी केली. एसीबीच्या सापळ्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यावर दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने भंडारा एसीबीचे उपअधीक्षक महेश चाटे यांच्या पथकाने केली.

X
COMMENT