आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला कार्यकर्त्या जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इनसेटमध्ये जखमी महिला - Divya Marathi
इनसेटमध्ये जखमी महिला
  • शपथविधी झाल्यानंतर प्रथमच गुलाबराव पाटील मायभूमित आले

जळगाव- नुकतंच महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मुंबईत शपथविधी पार पडल्यानंतर गुलाबराव पाटलांचे दुपारी 12.30 वाजता जळगावात आगमन झाले. यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष केला. यावेळी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दोन ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही महिला उपचारासाठी साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे पहिल्यांदाच जळगावात आगमन झाले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता गुलाबराव पाटील जळगावात आले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन पक्षाच्या दोन ज्येष्ठ महिला पदाधिकारी जखमी झाल्या. गुलाबराव पाटील खुद्द गर्दीत अडकले होते. सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी गर्दी बाजुला करत पाटील यांना जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून त्यांच्या मिरवणूक काढली. 

बातम्या आणखी आहेत...