आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या सात वर्षांच्या मुला-मुलीचा डबक्यात बुडून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डोणगाव जवळील शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघा मुला-मुलीचा मृत्यू झाला. तिसऱ्या मुलीने भावाला आणि मैत्रिणीला वाचवण्यासाठी मदत आणेपर्यंत उशीर झाला होता. 

 

समर्थ विपूल गायकवाड (वय ७) आणि नंदिनी अशोक मस्के (वय ७, दोघे रा. डोणगाव, गायकवाड वस्ती) अशी बुडालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. दोघांना वाचवण्यासाठी मदत आणण्याचा प्रयत्न समर्थची बहीण समृद्धीने (वय ५) केला. ही घटना सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिघेजण गावातील शेतात बोरे खाण्यासाठी गेले. बोरीजवळील खड्ड्यात पाणी साचले आहे. तेथून जात असताना समर्थ व नंदिनी हे दोघे त्या खड्ड्यात पडले. 

 

वाचवा वाचवा अशी त्यांनी हाक दिली. ते पाहून समृद्धी रडू लागली. तिने वस्तीच्या दिशेने धूम ठोकली. तेथे नातेवाइकांना प्रकार सांगितला. नीलेश गायकवाड नावाचा युवक तिच्या सोबत त्या खड्ड्याकडे पळत सुटला. पाण्यात उडी टाकली मात्र, त्याच्या हाताला दोघांचे मृतदेह लागले. त्यांना पाण्याबाहेर काढून गावकरी आणि कुटुंबीयांनी लगेच शासकीय रुग्णालय गाठले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली 
तिघेजण गावातील शेतात बोरे खाण्यासाठी गेले. 

 

बोरीजवळील खड्ड्यात पाणी साचले आहे. तेथून जात असताना समर्थ व नंदिनी हे दोघे त्या खड्ड्यात पडले. वाचवा वाचवा अशी त्यांनी हाक दिली. ते पाहून समृद्धी रडू लागली. तिने वस्तीच्या दिशेने धूम ठोकली. तेथे नातेवाइकांना प्रकार सांगितला. नीलेश गायकवाड नावाचा युवक तिच्या सोबत त्या खड्ड्याकडे पळत सुटला. पाण्यात उडी टाकली मात्र, त्याच्या हाताला दोघांचे मृतदेह लागले. त्यांना पाण्याबाहेर काढून गावकरी आणि कुटुंबीयांनी लगेच शासकीय रुग्णालय गाठले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली 


'दादा'च्या टाहोने गावकऱ्यांचे डोळे पाणावले 

समृद्धी आई-वडिलांच्या कुशीत बसून दादा...दादा... ची हाक मारत रडत होती. ते पाहून आईने हंबरडा फोडला. हृदयद्रावक दृश्य पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. समर्थ आणि नंदिनी हे दोघेही गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत होते. समर्थला एक बहीण आणि एक भाऊ आहे तसेच नंदिनीला सुध्दा एक बहीण आणि एक भाऊ आहे. दोघांचे वडील मोल मजुरीचे काम करतात. शाळकरी मुला-मुलींनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...