आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twintastic: एकाचवेळी गर्भवती झाल्या 2 बहिणी, एकाच दिवशी दिला बाळांना जन्म; दोघींनाही झाले जुळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओहियो - अमेरिकेत राहणाऱ्या दोन बहिणींना योगायोगाचा अतिशय सुखद अनुभव आला आहे. या दोघींचे सारे काही एकाचवेळी आणि एकाच दिवशी घडले आहे. या दोघी एकदाच गर्भवती झाल्या आणि एकाच दिवशी त्यांची डिलिव्हरी सुद्धा झाली आहे. यात आणखी महत्वाचे म्हणजे, त्या दोघींनाही देखील जुळे झाले आहेत. पण, गोष्ट येथेच संपली नाही. त्या दोघींच्या पोटातून जन्मलेले चारही बाळ क्वाड्राप्लेट अर्थात एकदाच जन्मलेले 4 बाळ आहेत. अर्थात त्यांना दोन वेग-वेगळ्या मातांनी जन्म दिले तरीही ते एकाच कपलच्या एम्ब्रियोतून दोघींच्या गर्भात गेले होते. 

 
एकाचवेळी कसे शक्य झाले?
> ओहियो प्रांतात राहणाऱ्या अॅनी जॉनसन आणि तिचा पती जॉबी यांच्या बाळावरून वाद सुरू होते. लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली तरीही यांना मूल झाले नाही. विविध स्वरुपाचे उपचार केले परंतु, काहीच फरक पडला नाही. त्याचवेळी अॅनीची मोठी बहिण क्रिसीने तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. क्रिसीने आपल्या बहिणीची सरोगेट बनण्याचा निर्णय घेतला. अॅनी आणि तिच्या पतीने त्यास होकारही दिला. 
> डॉक्टरने प्रक्रिया सुरू केली आणि सर्वप्रथम अॅनीचे अंडाशय घेतले. यानंतर जॉबीचे स्पर्म घेऊन फर्टिलिटी ट्रीटमेंट केली. यानंतर डॉक्टरांनी दोन एम्ब्रियो क्रिसीच्या शरीरात ट्रान्सफर केले. अॅनी आणि क्रिसी यांचे पीरियड सायकल एकच आहे. त्यामुळे डॉक्टरांनी एक चान्स म्हणून अॅनीच्या शरीरात सुद्धा दोन एम्ब्रियो इमप्लांट केले. 
> अॅनी आणि क्रिसीच्या चाचण्या घेतल्या असत्या त्या दोघीही गर्भवती झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्यानंतर झालेल्या चाचण्यांमध्ये दोघींच्याही पोटात जुळे असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघींची पीरियड सायकल एक असल्याने डिलिव्हरी डेट सुद्धा अगदी सारखीच आली. दोघींना एकदाच लेबर पेन झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या गर्भाशयातून जन्मले तरी हे चारही बाळ आपसात सख्खे आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...