आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बहिणींमध्ये लागले भांडण, वडिलांसोबत कोण आधी बेड शेअर करणार! बाप-लेकीची तुरुंगात रवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेत एका सख्ख्या बाप आणि मुलीला अनैतिक संबंधांसाठी तरुंगात डांबण्यात आले आहे. या दोघांनाही प्रत्येकी 8-8 वर्षांची शिक्षा होणार आहे. अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतात घडलेल्या घटनेत कौटुंबिक वाद देखील समोर आला आहे. कौटुंबिक वादातूनच बाप लेकींचे अनैतिक संबंध जुळले असो पोलिसांनी सांगितले. आरोपी बाप एकाच घरात आपल्या दोन मुलींसोबत राहत होता. त्या दोघींमध्ये आपल्या वडिलांना जास्त जवळ कोण करेल अशी स्पर्धा लागली होती. त्या दोघींच्या मनात एकमेकींबद्दल ईष्या निर्माण झाली होती. यातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे.


4 वर्षांपूर्वी कळाले आपल्याला आणखी एक मुलगी...
> ट्रॅव्हिस फील्डग्रोव (39) ने दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला तसेच तिच्याकडून जन्मलेल्या एका मुलीसोबत हॅस्टिंग्स येथे राहत होता. 4 वर्षांपूर्वी फील्डग्रोवला अचानक त्याच्या पहिल्या पत्नीने फोन केला आणि दोघांच्या संबंधांतून एक मुलगी सॅमन्था असल्याचे सांगितले. ती मुलगी 17 वर्षांची झाली होती. यानंतर फील्डग्रोवने आपल्या पहिल्या पत्नीकडून ती मुलगी घरात आणली आणि दोन्ही मुलींसोबत राहायला सुरुवात केली.
> याच दरम्यान आपले वडील घरात नव्याने आलेली सावत्र बहीण सॅमन्थाला जास्त वेळ देत असल्याची भावना पहिल्या मुलीच्या मनात निर्माण झाली. कालांतराने दोघींच्या मनात एकमेकींबद्दल ईर्ष्या वाढत गेली. या रागात त्यांनी बहीण-बहीण आणि बाप-लेकीच्या नात्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. आपल्या वडिलांना कोण जास्त जवळ करेल अशी स्पर्धाच सुरू केली. ही स्पर्धा इतक्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचली की आता वडिलांसोबत बेड शेअर कोण करणार याची पैजच लागली. याच ईष्येपोटी सॅमन्था आणि फील्डग्रोव यांच्यात अनैतिक संबंध जुळले.


प्रकरण पोलिसांमध्ये जाताच केला विवाह
पहिल्या बहिणीला आपल्या सावत्र बहीण आणि वडिलांमध्ये संबंधांचा सुगावा लागला. तिने बदला घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, बाप-लेकीला आपल्या संबंधांची चौकशी होणार अशी माहिती मिळाली तेव्हा दोघांनी कायद्यातून पळवाट शोधली आणि नाव बदलून एकमेकांसोबत विवाहच केला. तपास अधिकाऱ्यांना विवाहाची कागदपत्रे दाखवली आणि आपण पती-पत्नी आहोत असा सोंग रचला. परंतु, पहिल्या पत्नीचा जबाब आणि डीएनए चाचणीतून सत्य समोर आले. या दोघांवर आई आणि बहीण अशा दोघींनी वेग-वेगळ्या प्रांतांमध्ये अनैतिक संबंधांचा खटला दाखल केला. अमेरिकेच्या कायद्यानुसार, रक्ताच्या नात्यांमध्ये संबंध बनवणे गुन्हा आहे. हे दोघेही दोषी ठरले असून त्यांना कोर्टाकडून किमान 8 वर्षांची शिक्षा सुनावली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...