आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची पुन्हा एकदा नापाक कुरापत, एलओसीवर शस्त्रसंधीचे केले उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो

श्रीनगर - पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करी चौक्या आणि गावांवर गोळीबार केला. तंगधार भागात झालेल्या ह्या गोळीबारात दोन जवान शहीद तर एका नागिराचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान भारतीय सैन्याने पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

अधिकाऱ्यांच्या मते, नियंत्रण रेषेजवळील या गोळीबारात दोन घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत तर अनेक घरांची पडझड झाली नुकसान झाले आहे. यासह काही वाहने आणि जनावरांना नुकसान पोहोचले आहे. 

पाकिस्तानने 2 हजारांहून अधिकवेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानने यावर्षी आतापर्यंत 2050 पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शस्त्रसंधी उल्लंघनाच्या या घटनांमध्ये दहशतवाद्यांची घुसकोरीचा देखील समावेश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी 15 सप्टेंबर रोजी सांगितले होते. 

भारताने पाकिस्तानला अनेक वेळा विनंती केली की, 2003 च्या शस्त्रसंधीच्या कराराचे उल्लंघन करू नका आणि आपल्या सैनिकांना सीमेवर शांती राखण्याचे आदेश. मात्र यानंतरही अनेक वेळा सीमेवर या घटना घडल्या आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...