आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेट नाइट शूटिंग संपवून घराकडे निघाल्या होत्या 2 टीव्ही अभिनेत्री, समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना झाडावर जाऊन आदळली गाडी, घटनास्थळीच दोघींचा मृत्यू...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद - साउथ टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका कार अपघातामध्ये दोन प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अभिनेत्री शूटिंग संपवून घरी जात असताना त्यांची कार एका झाडावर जाऊन धडकली. घटनास्थळीच दोन्ही अभिनेत्रींचा मृत्यू झाला. मृत अभिनेत्रींचे नाव अनुषा रेड्डी आणि भार्गवी असे आहे.


रिपोर्टनुसार, ही घटना बुधवारी सकाळी विकाराबादजवळ घडली. अनुषा आणि भार्गवी यांच्योबत आणखी दोन व्यक्ती मंगळवारी रात्री शूटिंग संपवून विकाराबादवरुन हैदराबादकडे निघाल्या होत्या. यादरम्यान कार ड्रायव्हरने समोरून आलेल्या ट्रकला साईड देण्यासाठी गाडी रोडच्या खाली घेताच कार झाडाला धडकली. अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांची नावे चकरी आणि विनय आहेत. दोघांनाही हैदराबादच्या उस्मानिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भार्गवी (20) आणि अनुषा (21) दोघीही टीव्ही शोसाठी काम करत होत्या. भार्गवी 'मुत्याला मुग्गू' नामक टीव्ही शोमध्ये निगेटिव्ह भूमिका करत होती तर अनुषानेही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. अनुषा रेड्डी तेलंगणा येथील जयशंकर भुपालापल्ली येथील रहिवाशी आहे. 

बातम्या आणखी आहेत...