आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात फिरताना 2 मित्रांना सापडले गुप्त द्वार, आत दिसले इतके भयावह दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - उत्तर जर्मनीच्या एका जंगलात 2 युवकांनी रहस्यमयी बंकरचा शोध लावला आहे. जंगलात सहज फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना विचित्र पाइप दिसून आले. हे दोन्ही पाइप जंगलात का ठेवले असतील असा प्रश्न त्यांना पडला. यानंतर दोघांनी आसपासच्या परिसराचा तपास सुरू केला. त्याचवेळी गवताच्या ढिगाराखील त्यांना एक गुप्त द्वार सापडले. हे गुप्त द्वार एका बंकरचे होते. युवक त्याच ठिकाणी थांबले नाहीत. त्यांनी हातात टॉर्च घेऊन आत जाण्याचा निर्णय घेतला. बंकरमध्ये गेल्यानंतर त्यांना अशा काही वस्तू, मशीन लेख सापडले की पुन्हा त्या सुरुंगात जाण्याची त्यांची हिंमत होत नाही.


जमीनीखाली असलेल्या या दारात त्यांनी प्रवेश केला. यानंतर टॉर्चच्या मदतीने आतील छानणी करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांना एक खोली सापडली. या खोलीतून एक सुरुंगासारखा लांब रस्ता सापडला. युवकांनी त्यामध्ये सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला. त्या मार्गात आजूबाजूला आणखी 12 दरवाजे त्यांना दिसून आले. मात्र, भटकून जाण्याच्या भितीने त्यांनी थेट जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक दाराची कडी तुटलेली होती. तो एक-एक दार इतका वजनदार होता, की ते उघडण्यासाठी 5 ते 6 माणसे लागतील. हे सगळेच दार बँकेच्या लॉकरसारखे होते. इतके वजनदार आणि सुरक्षित द्वार कुणी का बांधले असतील? या प्रश्नातून त्यांची उत्सुकता वाढली.


आत दिसले इतके भयावह दृश्य
युवक स्वतःला रोखू शकले नाही. त्यांनी त्या द्वारांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आत जाताच त्यांना आणखी खोल्या सापडल्या. त्याच्या भिंतींवर आम्हाला वाचवा असे लिहिण्यात आले होते. तर काही ठिकाणी सैतानाचे नाव आणि चित्र कोरले होते. हे पाहून ते दोघे प्रचंड घाबरले. त्यांनी परत बाहेर निघण्याचा विचार केला. मागे वळून पाहिले तेव्हा आणखी एक मोठी खोली दिसून आली. त्यामध्ये भीमकाय मशीन ठेवली होती. त्याच्या सभोवताल फक्त पाणीच-पाणी होते. छताची अवस्था अतिशय वाइट होती. दोघांनी मशीनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा कॅमेरा पडला. त्या खोलीत आणखी काही होते जे आपण सांगू शकत नाही असा दावा त्या दोघांनी केला आहे.


कुणी बांधले हे बंकर?
सोशल मीडियावर दोघांनी आपला अनुभव मांडला. तसेच त्या गुहेचे फोटो सुद्धा जारी केले. सोबतच, हा बंकर किंवा गुहा कुणी आणि कशासाठी बांधली असावी असा सवाल केला. त्यावर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते, जर्मनीच्या सैनिकांनी अणुबॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही जागा तयार केली होती. तर काहींच्या मते, हे सरकारचे एक गुप्त प्रकल्प होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले Inside Photos

बातम्या आणखी आहेत...