आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात दोन तास सापळा; दोन संशयितांना केले जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रेल्वे गाडीत खाद्य पदार्थ विक्री करत असल्याच्या कारणावरून शुक्रवारी (दि.१४)युवकाला मारहाण झाली होती. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर चारही संशयित पसार झाले होते. त्यापैकी दोन संशयित रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी गजानन राठोड यांनी पथकासह बुधवारी दुपारी १२ ते २ या काळात स्थानकावर सापळा रचला. अडीच तास दबा धरून असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी शिताफीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. 


रेल्वे गाडीत खाद्यपदार्थ विक्री करताे या कारणावरून शुक्रवारी सकाळी दगडी पुलावर शेख रफीक व त्याच्या मित्राला बंटी पथराेड, विष्णू पथराेड, शिव पथराेड अाणि माेहित साेनी यांनी मारहाण केली होती. तसेच त्याच्याजवळील ११ हजार रूपये राेख अाणि माेबाईल असा १५ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवला हाेता. चारही संशयितांनी रफीक व त्याच्या मित्राला लाकडी दांड्याने मारहाण केली हाेती. याप्रकरणी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर चारही संशयीत पसार झाले होते. चौघांचा शोध सुरु असताना दोन संशयित बुधवारी दुपारी रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहती, डीवायएसपी गजानन राठाेड यांना मिळाली होती. 


कारवाई यशस्वी 
मिळालेल्या गुप्त माहितीच्या अाधारे रेल्वेस्थानक परिसरात अडीच तास सापळा लावला हाेता. दोन्ही संशयितांबाबत मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने कारवाई यशस्वी झाली. या प्रकरणातील अन्य दोघांनाही लवकरच अटक केली जाईल. 
-गजानन राठाेड, डीवायएसपी, भुसावळ 


अचानक कारवाई 
डीवायएसपी राठाेड यांच्यासह त्यांच्या पथकाने दोन्ही संशियतांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या कारवाईमुळे दाेन्ही संशयित बेसावध असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. लुटमारीच्या घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांना बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. अन्य दोन संशयितांचा शोध घेतला जात आहे. 


पातोंडीत हाणामारी; दोघांना अटक 
मुक्ताईनगर : किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पातोंडी गावात घडली. या प्रकरणी १२ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पातोंडी येथे मंगळवारी रात्री वाद निर्माण झाला. त्यामुळे संशयित संदेश सकपाळ ,अनिल सकपाळ, अमोल सकपाळ, राजेंद्र अनिल, विशाल सकपाळ, सतीष शिरतुरे, माणिक भगवान, राहुल अनिल, विनोद अर्जुन, मयुर ईश्वर, अजय गणेश, भिमराव कैलास साळी (सर्व रा. पातोंडी) यांनी जमावाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संजय भील (रा.पातोंडी) यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...