आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधीनगरातील राहुल सकट खूनप्रकरणी दाेन संशयितांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राजीव गांधीनगरातील युवक राहुल प्रल्हाद सकट याच्यावर परिसरातच राहणाऱ्या बावरी कुटुंबियांनी मार्च महिन्यात चॉपरने हल्ला केला होता. यात राहूलचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना अटक केली आहे. तर गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ संशयितांना कजगाव (ता. चाळीसगाव) येथून अटक केली अाहे. 


रविंद्रसींग मायासिंग बावरी (वय २४) व मालाबाई सत्यासिंग बावरी (वय ६०) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राहुल याचा खून केल्याप्रकरणी सत्यासिंग बावरी, रविंद्रसिंग मायासिंग बावरी, मलिंगसिंग मायासिंग बावरी, मालाबाई सत्यासिंग बावरी, कालीबाई सत्यासिंग बावरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बावरी कुटुंबियांच्या घराची तोडफोड केली होती. यानंतर बावरी कुटुंबीय बेपत्ता झाले होते. रामानंदनगर पोलिसांनी सत्यासिंग व कालीबाई या दोघांना अटक केली असून सध्या ते दोघे कारागृहात आहेत. तर इतर संशयित बेपत्ता होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे, रवींद्र पाटील, विनोद पाटील यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरूवारी पथकाने कजगाव येथून रवींद्रसींग व मालाबाई यांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. राहुल याच्या खुनानंतर राजीव गांधी नगर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...