Home | National | Delhi | two terrorists arested in Delhi

दिल्लीत २ अतिरेकी अटकेत; लाल किल्ल्याजवळ पकडले; ३२ बोअरचे पिस्तूल जप्त

वृत्तसंस्था | Update - Sep 08, 2018, 07:28 AM IST

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इस्लामिक स्टेट इन जम्मू-काश्मीरच्या (आयएसजेके) दोन दहशतवाद्यांना लाल किल्ल्याजवळ अटक क

  • two terrorists arested in Delhi

    नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इस्लामिक स्टेट इन जम्मू-काश्मीरच्या (आयएसजेके) दोन दहशतवाद्यांना लाल किल्ल्याजवळ अटक केली. गुरुवारी रात्री केेलेल्या या कारवाईत २४ वर्षीय परवेज आणि १९ वर्षीय जमशिद यांना जामा मशीद बस स्टॉपजवळ अटक करण्यात आली. काश्मीरला जाण्यासाठी ते स्टॉपवर बसलेले होते. त्यांच्याकडून ३२ बोअरचे पिस्तूल आणि चार सेलफोन जप्त करण्यात आले.


    उमर इब्न नाझिर आणि आदिल ठोकर यांच्या इशाऱ्यावर हे दोघे काम करत होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे उपायुक्त पी. एस. कुशवाह यांनी शुक्रवारी सांगितले, दोघेही काश्मीरच्या शोपियाचे रहिवासी आहेत. दिल्लीत दहशतवादी कारवाई करण्याचा त्यांचा कट नव्हता. तर, ते दोघे केवळ ट्रान्झिट पॉइंट म्हणून वापरले जात होते. परवेज याच्या एका भावाला याच वर्षी २६ जानेवारीला शोपियामध्ये सुरक्षा दलांनी गोळ्या घातल्या होत्या. परवेज उत्तर प्रदेशात गजरोलामध्ये एमटेक करत आहे. तर जमशिद हा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे. मोहंमद अब्दुल्ला बासित याच्या कारवायांत त्याने मदत केली होती.

Trending