आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैशच्या टॉप कमांडरसहित दोन दहशदवाद्यांना कंठस्नान, 10 हजार अतिरीक्त सुरक्षा दल घाटीत तैणात होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीरच्या शोपियामझील बोना बाजार परिसरात आज(शनिवार) सुरक्षादल आणि दहशदवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहौरी उर्फ बिहारीसहित दोन दहशदवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून हत्यारे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. रिपोर्टनुसार- केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांना पाहणी करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवले आहे. केंद्र सरकार काश्मीरमध्ये 10 हजार अतिरीक्त सुरदल वाढवण्याच्या विचारात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरच्या सीमेवर तणावाची स्थिती बनली आहे.


सरकारने याप्रकरणी परत विचार करावा- मुफ्ती
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी ट्वीट केले- "केंद्राने घाटीत 1000 सैनिक तैणात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीती पसरू शकते. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची काही गरज नाहीये. जम्मू-कश्मीरचे प्रकरण राजकीय आहे. याला लष्कर सोडवू शकणार नाही. सरकारला याबाबत परत विचार करायला हवा."


कारवाईत अडथळा आणल्यामुळे अनेक आंदोलक जखमी
जिल्ह्यात सुरक्षा बलाच्या नाकाबंदीत आणि तपासात अनेकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सैन्यावर दगडफेक करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी अश्रु धुरांचे गोळे सोडण्यात आले आणि लाठीचार्जही करावा लागला. यात अनेक लोक जखमी झाले आहेत. दहशदवाद्यांना ठार केल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि राज्य पोलिस आणि लष्कराविरुद्ध घोषणा देत दगडफेक केली.