आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात दोन हजार कोटी खर्च, फक्त ९८ कोटींसाठी थांबली ‘जलयुक्त’ची कामे

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गत पाच वर्षांत महायुती सरकारची याेजना

औरंगाबाद- गत पाच वर्षांत युती सरकारने गाजावाजा करत सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना अंतिम टप्प्यात आहे. गेल्या चार वर्षांत यात २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या योजनेत जी कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील फक्त ९८ कामे शिल्लक आहेत. मात्र युती सरकारच्या काळातील योजनांना बंद करण्याचे धोरण नव्या सरकारने अंगीकारल्याने हा निधी मंजूर होईल की नाही, याबद्दल विभागातील अधिकारी साशंक आहेत.

मराठवाड्यात गेल्या वर्षांत या योजनेवर दोन हजार ३३३ कोटी रुपये खर्च केले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते, यात मराठवाड्यात अभिसरण व लोकसहभाग, असे मिळून सुमारे दोन हजार ३३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही अद्यापही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना लागलेला टँकरचा फेरा अद्यापही कायम आहे.  जलयुक्त शिवार अभियानाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.  दोन हजार ७७ कामे प्रगतिपथावरच्या नावावर अपूर्ण आहेत.  त्यास वर्क ऑर्डर न मिळाल्याने ही कामे होण्याची शक्यता धुसर आहे. 
 
जिल्हानिहाय  अपूर्ण कामे


जिल्हा                  निधीची गरज

औरंगाबाद          ६ कोटी ३२ लाख

जालना     /           १६ कोटी १७ लाख

बीड                    २३ कोटी ९९ लाख

परभणी             १ कोटी २५ लाख

हिंगोली                अप्राप्त

नांदेड               ४ कोटी ५० लाख

लातूर                ४६ कोटी ३ लाख

उस्मानाबाद          ००

एकूण              ९८ कोटी ४८ लाख

बातम्या आणखी आहेत...