आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन आदिवासी भावंडं खेळणार अथेन्स आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. पण, आता त्यांची प्रेरणा घेत या भागातील अन्य मुलेही विविध क्षेत्रांत प्रगतीसाठी सज्ज झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांत प्रोत्साहन देण्याच्या 'मिशन शक्ती'अंतर्गत ब्रह्मपुरीतील ऋषिकेश, विजयालक्ष्मी येरमे हे दोघे बहीण-भाऊ अथेन्स येथे आॅक्टोबरमध्ये अायाेजित आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागीसाठी जाणार आहेत. 


दोघांचा इथपर्यंतचा प्रवास रोमांचक आहे. वडील पितेश्वर येरमे कराटे खेळाडू होऊ शकले नाहीत. त्यांचे अपूर्ण स्वप्न त्यांनी दोन्ही मुलांत पाहिले. दोन्ही मुलांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. पितेश्वर येरमे हे ब्रह्मपुरी येथे पटवारी आहे. विद्यार्थी असताना त्यांना कराटे शिकायची आवड होती. आज खेळ वा क्रीडा प्रकार शिकायचा म्हटले तर सोयी-सुविधा व मार्गदर्शक उपलब्ध आहेत. पण ३० वर्षांपूर्वी असे नव्हते. कराटेचा मास्टर्स तर एखादाच असायचा.पितेश्वर सरकारी कर्मचाऱ्याकडून कराटे शिकायचे. पण कालांतराने त्यांची बदली झाल्यावर शिकणे बंद झाले. कराटे चॅम्पियन होण्याचे येरमेंचे स्वप्न अपूर्ण राहिले. ते त्यांनी ऋषिकेश, विजयालक्ष्मी या दोन मुलांत पाहिले. मुलांनीही ते पूर्ण केले. सेन्साई सुनील मेश्राम यांच्याकडून दोघांंनी कराटेचे प्रशिक्षण घेतले. दोघांनीही ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. दरम्यान गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी ९ ऑगस्टल आदिवासी दिनानिमित्त त्यांच्या अधिकारात सार्वजनिक सुटी जाहीर केली. यासंदर्भात तेथीललोकप्रतिनिधींनी तशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती. हे विशेष. 


केंद्राच्या योजनेतून मदत 
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत दोघांची निवड झाली, आदिवासी विकास िवभागातर्फे एकात्मिक आदिवासी िवकास प्रकल्पाकडे पाच लाखांचा निधी वळता केला. मे २०१८ मध्ये विजयालक्ष्मीने शालेय मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाचे नि:शुल्क शिबिर घेतले. ती अकरावीत, ऋषिकेश बारावीत शिकत आहे. यापूर्वी चंद्रपूरच्या आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर केले होते. हे बहीण-भाऊ कराटे खेळणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...