आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव : जळगाव राष्ट्रीय महामार्ग बुधवारी सकाळी ६ वाजता चालकास डुलकी लागल्याने दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने गगन ब्रह्मे (२६, छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांचा मृतदेह व संजय राठिया (रा.पोरबंदर, गुजरात), राकेश यादव (चिन्मयवाडी, मध्य प्रदेश) या दोन जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या अपघातानंतर ३ किमी अंतरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
राकेश यादव व गगन ब्रह्मे हे दोघे रसायन भरलेला ट्रक घेऊन मध्य प्रदेशकडून नागपूरकडे निघाले होते. बुधवारी सकाळी पारोळ्यापासून १२ किमी अंतरावरील सार्वेजवळील हिरापूर फाट्याजवळ समोरून भरधाव ट्रकवरील चालक संजय राठिया (रा.पोरबंदर, गुजरात) याला डुलकी लागली. नेमका या भागात उतार असल्याने ताबा सुटून अनियंत्रित झालेला त्याचा ट्रक समोरील रसायन घेऊन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर धडकला. यामुळे दोन्ही वाहनांचे समोरील भाग पूर्णपणे तुटून ट्रक एकमेकांमध्ये अडकल्या. अपघातानंतर क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहनांना वेगळे करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.