आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी परिचारिकेने बाळंतपण केल्यामुळे दोन जुळ्यांचा मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव आरोग्य उपकेंद्रातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नियमित परिचारिका कुटुंब नियोजन शिबिरात असल्यामुळे कंत्राटी परिचारिकेने केलेल्या बाळंतपणात द्विबीज जुळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी नवेगाव आरोग्य उपकेंद्रात घडली. या घटनेमुळे गावात संतप्त वातावरण झाले होते. नवेगाव आरोग्य उपकेंद्र गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अहेरीपासून 40 किमीवर आहे. सुमन गणेश सोनुले असे या मातेचे नाव असून तिचे हे दुसरे बाळंतपण होते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी दिली.28 सप्टेंबरला सोनोग्राफी केली असता 17 डिसेंबर ही प्रसूतीची तारीख आली. दरम्यान, 7 ऑक्टोबरला सुमन गणेश सोनुले यांना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. 8 ऑक्टोबरला त्यांच्या सासू लिलाबाई डॉक्टरांचे न ऐकता त्यांना घरी घेऊन जायला लागल्या. त्यावेळी त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेण्यात आल्याचे डॉ. किरण वानखेडे यांनी सांगितले. 11 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता कळा सुरू झाल्याने त्यांना नवेगाव आरोग्य उपकेंद्रात आणण्यात आले. तेथे कंत्राटी परिचारिका वैशाली कोहळे यांनी प्रसूती केली. त्यात द्विबीज जुळे मरण पावले. नियमित परिचारिका तोरे यांची अहेरी येथील कुटुंब कल्याण शिबिरात ड्यूटी असल्याने त्या तिथे नव्हत्या.
साधारणत: पहिल्या प्रसुतीत बारा तास तर दुसऱ्या प्रसुतीत सहा तासांचा लेबर पेन होतो. पण, या प्रकरणात सुमन गणेश सोनुले यांना रात्रीच कळा सुरू झाल्या असाव्या. परंतु नातेवाईकांनी सकाळपर्यंत वाट पाहून भरती केले असावे. या विलंबामुळे जुळ्यांचा गर्भातच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉ. किरण वानखेडे यांनी व्यक्त केला.