accident / दाेन वाहनांची समाेरासमाेर धडक; दाेन्ही चालक ठार 

दुर्घटना राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंटवर भीषण अपघात 

Aug 25,2019 11:42:00 AM IST

अकाेला : दाेन अवजड वाहनांची समाेरा-समाेर धडक झाल्याची घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर तालुक्यातील शेगाव टी पाॅइंटजवळ घडली. या दुर्घटनेत दाेन्ही वाहनांचे चालक ठार झाले असून, एक जण जखमी झाला. या घटनेमुळे महामर्गावरील वाहतूक विस्कळीत झाली हाेती. चार तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

२४ ऑगस्ट राेजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कुरिअर घेऊन ट्रक (क्रमांक -एचआर-५५- १३३४) खामगावकडे जात हाेता. त्याच वेळी विरुद्ध दिशेने कंटेनर (क्रमांक -एमएच-४८-बीएम २५४३) अकाेल्याकडे येत हाेता. या कंटेनरमध्ये लोखंडी कॉइल्स हाेत्या. दाेन्ही वाहनांमध्ये समाेरा-समाेर धडक झाली. या अपघातात दाेन्ही वाहनचालकांचा मृत्यू झाला. असम खान हबीब खान (वय ४९, रा. येवात, हरियाणा) अाणि रामसिंह छोटेलाल यादव (वय २३, रा. शंकरपूर, अंजरिया सुल्तानपूर,उत्तरप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा वाहनचालकांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत शिंदे, अनिल खिल्लारे, गिरीश वीर, देवानंद कायंदे, महामार्ग पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन गावंडे, दिनकर सोळंके, पोलिस कर्मचारी दिनेश झटाळे, योगेश मेहरे, अमरदीप गुरू, अजय दामोदर, प्रशांत डोईफोडे यांना साेबत घेत धाव घेतली. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली.

एक जखमी; चार तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत
दाेन जड वाहनांची समाेरा-समाेर धडक झाल्याची घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर तालुक्यातील शेगाव टी पाॅइंटजवळ घडली. यात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले तर वाहनांचा असा चुराडा झाला.

असे अाहेत धाेके
बाळापूर महामार्ग पाेलिस चाैकीकडून खामगावकडे जाताना वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक असते. चाैकीकडून खामगावकडे जाणाऱ्या वळण मार्गावर तर दक्षता घ्यावी लागते. पाेलिसांना तपासणीसाठी वाहने थांबवावी लागतात. त्यामुळे दाेन्ही बाजूच्या चालकांना वाहन चालवतांना सावधानता बाळगावी. चौकीपासून पुढे शेगाव टी पाइंटी धाेकादायक अाहे. शेगावकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनाचालकांनाही विशेष काळजी घ्यावी लागते.

केबिन कापून काढले मृतदेह बाहेर
वाहनांची धडक जाेरात झाल्याने दाेन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली. मृतदेह सहज वाहनाच्या बाहेर काढणेही शक्य हाेत नव्हते. त्यामुळे पाेलिसांना वाहनांची केबिन कापून मृतदेह बाहेर काढावी लागली. कंटेनरमध्ये ३५ टनाचे लोखंडाच्या क्वाॅईल्स हाेत्या. त्या मागिल केबिन फोडून चालकावर काेसळल्या हाेत्या. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

दाेन्ही जड वाहने राेडवर असल्याने रोड त्वरित मोकळा करणे सुद्धा आवश्यक हाेते. त्यामुळे ३ क्रेनला आणण्यात आले. दोन्ही ट्रक वेगळे करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळाची उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी पाहणी केली.

X