आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पतीसह माय-लेकीचा मृत्यू; 6 वर्षांचा मुलगा वाचला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी - उपळी येथील विवाह आटाेपून पाथरी तालुक्यातील रेणाखळी तांड्यावर दुचाकीवरून परतत असताना बीड-परळी राज्यमार्गावरील कुप्पा फाट्यानजीक  ब्रम्हनाथ तांड्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात चिरडून पतीसह मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात या कुटुंबातील एक सहा वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला.


वडवणी तालुक्यातील उपळी येथील  विवाह समारंभासाठी पाथरी तालुक्यातुन रेणाखळी तांड्यावरील राठोड दांपत्य व दोन मुले असे कुटुंबीय मंगळवारी आले होते. विवाह समारंभ आटोपून ते दुचाकीवरून परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गणेेश राठोड  (२८) पत्नी ललीबाई गणेश राठोड (२३ ) आणि मुलगी रोशनी गणेश राठोड (११) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा रोहन गणेश राठोड (६) हा सुदैवाने वाचला.  वडवणी पोलिसांनी तिन्ही मृतदेह कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.