आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुचाकींची समाेरासमाेर धडक; 1 ठार, 1 गंभीर, पिशोर कन्नड रस्त्यावर घडला अपघात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पिशोर : दाेन दुचाकींच्या समाेरासमाेर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पिशाेर कन्नड रस्त्यावर अंजना पळशी प्रकल्पासमाेर घडली. सचिन सुभाष उपाध्ये असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अाहे.

सचिन उपाध्ये (२२) शुक्रवारी (दि. १०) बारा साडेबाराच्या दरम्यान दुचाकी (एमएच २० एफबी २१५४) वरून कन्नडकडे. जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार संतोष रामराव पवार रा. शिऊर बंगला (३४) ता. वैजापूर हे (एमएच २० ई एक्स ७५३९) पिशोरकडे येत असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. सचिन सुभाष उपाध्ये यास डोक्याला जबर मार लागला, संतोष पवार या दोन्ही जखमींना नागरिकांनी उपचारासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. नातेवाइकांनी सचिनला औरंगाबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सचिन उपाध्ये यास तपासून मृत घाेषित केले. मृत सचिन हा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.