आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नपत्रिका वाटून परतताना अपघात, दुचाकीवरील नवरदेवाच्या भावासह मामाचा मृत्यू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली घटना, अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार
  • सुखदायी प्रसंगात कन्हेरगावच्या मोरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर कोसळला

संदीप शिंदे 

कुर्डुवाडी - सख्ख्या भावाच्या लग्नपत्रिका वाटून घरी परतत असताना पिकअपने समोरून मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरदेवाचा भाऊ व मामा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. २ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास कुर्डू (ता. माढा) हद्दीत झुंडरे वस्तीजवळ घडली. पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.नवरदेवाचा भाऊ अभिजित रमेश मोरे (२२, रा. कन्हेरगाव, ता. माढा) व मामा महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर, डोणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत अभिजित मोरे याच्या सख्ख्या भावाचे दि. १४ रोजी लग्न असल्याने बारलोणी (ता. माढा) येथे पाहुण्यांना पत्रिका देऊन पिंपळनेरकडे निघाले असताना मोटारसायकल (एमएच ४५ डब्ल्यू ९९४३) कुर्डू शिवारातील झुंडरे वस्तीजवळ आली असताना टेंभुर्णीकडून येणाऱ्या पिकअपने (एमएच २४ एबी ६३२५) समोरून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या ठिकाणी पत्रिका सर्वत्र पसरलेल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व बालाजी कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.