आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - पावसात हेल्मेट व रेनकोट घालून छत्रपती शाहू महाविद्यालयात निघालेल्या एम. डी. द्वितीय वर्षाच्या डॉक्टर विवाहिता सारिका महेश तांदळे-गरकल (३०, रा. समर्थ गार्डन, शिवाजीनगर) यांचा दुचाकी स्लिप होऊन पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली आल्याने एका बाजूने डोक्यासह हेल्मेटचाही चुराडा झाला. गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास पैठण रस्त्यावरील माँ-बाप दर्ग्यासमोर हा अपघात झाला.
सारिका याच महाविद्यालयात कायाचिकित्सा विभागात प्रॅक्टिस करत होत्या. त्यांचे पती महेश हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून बदनापूर महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे सारिका महाविद्यालयात जाण्यासाठी मोपेड दुचाकीने (एमएच २० सीके ३९४९) घरातून निघाल्या. पैठण रोडकडे पावसाचा जोर जास्त होता. रेनकोट व हेल्मेट घातलेल्या सारिका पैठण रस्त्यावरील माँ-बाप दर्ग्याजवळून जात असतानाच त्यांची दुचाकी घसरली व त्या कोसळल्या. दुचाकीवरून खाली पडताच पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलास प्रजापती घटनास्थळी गेले.
तीनवर्षीय चिमुकला रोजच असायचा सोबत
सारिका त्यांच्या तीनवर्षीय मुलाला रोज महाविद्यालयात घेऊन जात असत. परंतु गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने सारिका यांनी त्याला घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. नेमके आजच त्याला घरी ठेवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.