आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद, तब्बल ३६ दुचाकी जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शासकीय रुग्णालय, मार्कंडेय रुग्णालय, सात रस्ता, अक्कलकोट शहर या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघा तरुणांना सदर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश रामचंद्र पुरी (वय ३२, रा. काटी सावरगाव, तालुका तुळजापूर), संतोष निवृत्ती सोनवणे (वय ३४, रा. हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर), दत्तात्रय दिलीप जाधव (२४, रा. हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर) या तिघांना अटक झाली आहे. पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली‌. 


मास्टर कीचा वापर करायचे 
तिघेजण मिळून पाळत ठेवून चोरी करायचे‌. ज्या ठिकाणी नागरिक वाहने पार्किंग केल्यानंतर उशिरा येतात ते ठिकाण शोधत. दोघेजण पाळत ठेवत असत. मास्टर कीचा वापर करून अथवा स्वीच वायर तोडून गाडी पळवत होते. अशी चोरी करण्याची पद्धत होती, अशी माहिती फौजदार कैलास कांबळे यांनी दिली. 


गणेश दुबईत कामाला होता 
या घटनेतील संशयित गणेश हा काही वर्षांपूर्वी दुबई येथे कामाला गेला होता, ही माहिती तपासात समोर आली आहे. तो अलीकडील काही वर्षांपासून सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट परिसरात चोरी करायचा. एका ठिकाणी संतोष, दत्तात्रय याच्यासोबत ओळख झाली. त्यावरून तिघेजण मिळून दुचाकी चोरत होते. काटी सावरगाव येथील त्यांच्या शेतामध्ये या दुचाकी लपवून ठेवल्या होत्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. 


या पथकाने केली कारवाई 
पोलिस उपआयुक्त मधुकर गायकवाड, सहायक आयुक्त महावीर सकाळे, पीआय अंकुशकर, पीआय कांबळे यांच्यासह उद्धव घोडके, पोपट बोराटे, अबू शेख, जुबेर तांबोळी, अनिल जाधव, सिद्धू गायकवाड, अमोग जमादार, किशोर पवार, विठ्ठल काळजे, हरीश पवार, विठ्ठल जाधव, प्रशांत चव्हाण, अमोल कुंभार, संतोष सुवै, कुमार शेळके, गणेश कानडे, धायगुडे. 


असे पडले चोरटे जाळ्यात 
मागील महिन्याभरापासून सदर बझार पोलिस या टोळीच्या मागे होते. चोरी करतानाची माहिती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली होती. त्याआधारे माहिती काढत असताना गणेश याचे नाव समोर आले. त्याला शोधत असताना संतोष याची माहिती मिळाली. पोलिस सावरगाव येथे जाऊन चौकशी केली असता काही माहिती मिळाली‌. फायनान्स कंपनीला हप्ते न भरल्यामुळे या गाड्या आणल्या आहेत. पाच हजार रुपये मध्ये काही लोकांना तो गाड्या देत होता. उर्वरित पैसे कागदपत्रे दिल्यानंतर देण्यात सांगत होता. या सगळ्यांची माहिती काढताना या घटनेचा उलगडा झाला. दुचाकीची माहिती आरटीओ विभागाकडून घेण्यात येत आहेत. या गाडीचे मूळ खरेदीदार कोण आहेत त्यांना संपर्क साधून माहिती देण्यात येत आहे . 

बातम्या आणखी आहेत...