आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गौरी पुजनासाठी गेलेल्या दोन महिलांसह चौघे बुडाले, एनडीआरएफच्या टीमकडून शोधकार्य सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- जिल्ह्यातील हिंगणघाटच्या वणा नदीच्या घाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिला व दोन मुले वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेल्यानंतर एका महिलेला पोलिस कर्मचाऱ्याने नदीतून जिवंत काढले, पण उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना तिचा मुत्यू झाला. 

शास्त्री वार्डातील काही महिला घरी गौरी पूजन करून वणा नदी रेल्वे पुलाजवळ कवडघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रिया रंजित भगत (वय35) मुलगा अभी(वय10) आणि अंजना(वय13) हे आले होते. यावेळी अचानक अभी नदीपात्रात वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. मात्र ती त्याला वाचवू शकली नाही आणि बुडाली. त्यानंतर त्यांनी आई त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात गेली. त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी शेजारच्या दिपाली मारोती भटे यांनी पाण्यात उडी घेतली पण त्याही वाहून गेल्या. 

यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे दिसताच पोलिस कर्मचारी रामदास चाकोले यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीपाण्यात उडी मारून रिया भगतला जिवंत पाण्या बाहेर काढले. पण उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना रीयाचा मृत्यू झाला. एनडीआरएफची टीम बुडालेल्या तिघांचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

0