आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये सराफाला गंडा घालणाऱ्या औरंगाबादच्या दोन महिलांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या हातचलाखी करून सराफा दुकानातून २३ हजार रुपयांची सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोन महिलांना परळी शहर पोलिसांनी औरंगाबाद शहरातून अटक केली.  सय्यद शबाना बेगम उर्फ शब्बो इम्रान (३४, रा. नंदनवन कॉलनी, औरंगाबाद) व मुन्नी उर्फ परवीन शेख अब्दुल रहिम (३७, रा. संजयनगर, औरंगाबाद) अशी या महिलांची नावे आहेत.


परळी शहरातील सोन्या चांदीचे व्यापारी बालाजी टाक यांच्या दुकानातून ८ जून रोजी सोने खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करून २३ हजार रुपये किमतीची सात ग्रॅम सोनसाखळी लंपास केली होती. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर  टाक यांनी २० जूनपर्यंत या महिलांचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा मिळत नसल्याने त्यांनी २० जून रोजी परळी शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली होती. यावरून गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, महिलांच्या हातचलाखीची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मेंडके, जमादार बाळासाहेब बांगर, माधव तोटेवाड, सुंदर केंद्रे यांनी माहिती मिळवून या महिलांना दुकानात घेऊन येणाऱ्या मोहम्मद फरहान याला २१ जून रोजी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने महिलांची नावे व पत्ते सांगितल्यानंतर गुरुवारी महिलांना औरंगाबादेतून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोनसाखळी जप्त केली.