आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाहोद (गुजरात) - जिल्ह्यात पुतण्याचा मृत्यू झाल्यावर दोन महिलांना जाहीर विवस्त्र करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला या नात्याने नणंद-भावजयी आहेत. त्यांना निर्वस्त्र करून झाडाला बांधून गरम सळईने डागण्यात आले. खूप वेळ छळ केल्यानंतर पीडितांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर ही घटना उजेडात आली. मोठा दीर मासूभाई डामोरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दाहोद जिल्ह्याच्या झालोद तालुक्यातील टाढागोला गावाची आहे.
पीडितेच्या मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल...
दोन महिला निर्वस्त्र करून छळ केल्याप्रकरणी लिमडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिता नुरिबेनची मुलगी पुष्पाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. तथापि, याप्रकरणी आरोपी दिराला अद्याप अटक झालेली नाही.
14 वर्षीय मुलाचा झाला होता आकस्मिक मृत्यू
मासूभाई डामोर यांचा 14 वर्षीय मुलगा भाविकचा काही दिवसांपूर्वी ताप आणि पायात भेगा पडल्यानंतर मृत्यू झाला होता. या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांना यात जादूटोण्याची शंका आली. ही शंका घेऊन मंगळवारी मासूभाई गावातील इतर लोकांसह मध्यप्रदेशच्या काजली गावात गेले. तेथील भोंदूबाबाला त्यांनी आपल्या मनातील शंका सांगितली. डामोरचे बोलणे ऐकून ओझाने नणंद आणि भावजयीचे नाव घेतले. भोंदू म्हणाला- या दोघींवर भूताची छाया आहे, यामुळेच तुझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
मुलगा-मुलगी अन् जावयासह इतरांचा कृत्यात सहभाग
यावर मासूभाईचा मुलगा, मुलगी आणि जावयासहित इतरांनी बुधवारी 5 वाजेच्या सुमारास रक्ताच्या नात्याला तिलांजलि देत बुधीबेन आणि नुरीबेनशी मोठा वाद घातला. दोघींना घरातून फरपटतच बाहेर काढले. यानंतर निर्वस्त्र करून झाडाला बांधले. लोखंडाच्या गरम सळईने जागोजागी डागण्या दिल्या.
प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वाचवायला गेलो, तर धक्के देऊन पिटाळून लावले
अंधश्रद्धेमुळे घरातील सख्ख्या नात्यातील महिलांवर एवढा अमानुष अत्याचार करण्यात आला. हे पाहून सर्व स्तब्ध झाले होते. प्रत्यक्षदर्शी बुधीबहन डामोर म्हणाल्या- आम्ही सर्व घरात होतो. तेवढ्यात ते आले आणि लीलाबेन व भावजयी नूरीबेनला फरपटत घेऊन गेले. दोघींना निर्वस्त्र करून कपडे उतरवून झाडाला बांधले. गरम सळईने डागण्या दिल्या. आम्ही सोडवायला गेलो, तर धक्के देऊन पिटाळून लावले. आम्ही खूप भ्यायलो होतो. काकाचा मुलगा रवीन्द्रच्या मागे ते तलवार घेऊन लागले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.