आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बिग बॅश लीगमध्ये प्रथमच मॅचमध्ये एकाचवेळी असतील दोन महिला फिल्ड अंपायर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅडिलेड - महिला बिग बॅश लीगमध्ये रविवारी अॅडिलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी न्यू साउथ वेल्सच्या क्लेयर पोलोसेक आणि साऊथ ऑस्ट्रेलियाच्या एलोइस शेरीडेनयांना अंपायरींगची जबाबदारी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात प्रोफेशनल क्रिकेटमध्ये प्रथमच एखाद्या मॅचमध्ये दोन महिला फिल्ड अंपायर्स असतील. 

 
ही मॅच अॅडिलेड ओव्हलमध्ये खेळली जाईल. क्लेयर सीए सप्लिमेंट्री अंपायर पॅनलच्या सदस्य आहेत. त्या ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांच्या एखाद्या सामन्यात अंपायरींग करणाऱ्या पहिला महिला अंपायर होत्या. 

बातम्या आणखी आहेत...