आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिलांनी आपल्या पतींना घटस्फोट देऊन एकमेकांसोबत केले लग्न, पण रजिस्ट्रारने लग्नाची नोंदणी करण्यात दिला नकार; फारच रंजक आहे यांच्या लग्नाची कहानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हमीरपूर : सुप्रीम कोर्टाने कलम 377 ला परवानगी दिल्यापासून समलैंगिकतेचे अनेक प्रकरणं समोर येत आहेत. उत्तरप्रदेशच्या हमीरपूर येथे नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे दोन महिला एकमेकांच्या प्रेमात इतक्या पागल झाल्या होत्या की, दोघींनी आप-आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि एकमेकांसोबत लग्न केले. 

 

रजिस्ट्रारने नोंदणी करण्यात दिला नकार

मीडिया रिपोर्ट्सच्या मते. दोन्ही महिला विवाहनोंदणी कार्यालयात त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यसाठी गेले होते. तेथे त्यांनी एकमेकांना दिलेल्या वजनांचे एक अॅफिडेव्हीट दिेले. पण तेथेय त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्यात आली नाही. सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला समाज मान्यता देण्याबाबतचा आदेश विभागाकडे आला नसल्यामुळे त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येणार नसल्याचे रजिस्ट्रारने सांगितले. 

 

लग्न करताना दिले एकमेकांना 7 वचन 
दोघी नोकरी करतील आणि याबाबत दोघींपैकी कोणालाही काहीच हरकत नसावी, दोघी कोणत्याही पर पुरुषासोबत शारिरीक संबंध बनवणार नाहीत तसेच मुल जन्मास घालण्याची इच्छा व्यक्त करणार नाही. अशाप्रकारचे एकूण सात वचन त्यांनी एकमेकांना दिले असून ती पूर्ण करण्याची शपथ देखील घेतली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, राठ येथील रहिवासी अभिलाषाने आणि कधौली येथील रहिवासी दीपशिखा यांनी आप-आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि विवाह केला. दोघींपैकी अभिलाषाने स्वतःला पती तर दीपशिखाने स्वतःला पत्नी मानत मंदिरात लग्न केले. दोन्ही महिलांचे वय 21 वर्ष असून एक जण एका मुलाची आई आहे.  

 

पतींना दिला घटस्फोट

दोन्ही युवतींची 7 वर्षांपूर्वी गावातच भेट झाली होती. त्यानंतर दोघींमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दरम्यान दोघींचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले. पण दोघींचेही सासरी मन न रमल्यामुळे त्यांनी आपल्या पतींना घटस्फोट दिला आणि एकमेकांसोबत लग्न केले. 

 

बातम्या आणखी आहेत...