आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर ऑटो पलटी झाल्याने चिमुकला ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला - अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर ऑटो उलटला. चिमुकला दबल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना अकोट फैल मधील भारत नगरमध्ये बुधवारी दुपारी घडली. 

 

अकोला शहरातील अकोट फैलमधील भारत नगर येथील ऑटो घराचे साहित्य घेऊन जात असताना रस्त्याच्या खड्ड्यामध्ये ऑटोचा मागील चाक अडकला आणि तो उलटला. या ऑटोखाली दोन वर्षाचा मोहम्मद तोसिफ हा आला त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला घरासमोर खेळणाऱ्या तोसिफचा मृत्यू झाल्याची वार्ता नातेवाइकांना कळतात त्यांनी एकच आक्रोश केला. ऑटो चालक मोहम्मद जफर मोहम्मद मुजफ्फर याला घटनेनंतर अकोट फैल पोलिसांनी ऑटो जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

खराब रस्त्यामुळे घडला अपघात 
चिमुकल्याच्या मृत्यूला खराब रस्ता जबाबदार असल्याने नागरिकांनी नगरसेवकांवर आपला रोष व्यक्त केला. त्यांनी नगरसेवकांच्या घरी धडक दिली. शेकडो नागरिक जमा झाल्याने पोलिसांनी परिस्थिती हाताळली. अकोट फाइल मधील अनेक रस्ते हे खराब आहेत या रस्त्याने लहान मोठे खड्डे असून त्यामध्ये नालीतील पाणी साचलेले आहे परिणामी चालकांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना येथे घडत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...