आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेतून उठल्यावर 2 वर्षांच्या मुलीने मागितले कुरकुरे, आई दुकानात गेली, तोपर्यंत मुलीसोबत घडली भयंकर घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर : गुरुवारी इंदूर येथे एक लाजिरवाणी घटना घडली. दोन वर्षांच्या निरागस मुलीसोबत तिच्या मामानेच अत्याचार केला. पोलिसांनी रेप आणि पॉक्सो अॅक्टमध्ये केस दाखल करुन आरोपीला अरेस्ट केले. सीएसपी सराफा डीके तिवारी यांनी सांगितले की, आरोपी लखन क्षेत्रातील गुंड आहे. त्याच्यावर व्दारकापुरी क्षेत्रामध्येही आरोप आहे. महिलेचा पती मूसाखेडीमध्ये राहतो. तिचा आणि तिच्या पतीचा वाद झाल्यामुळे ती एक वर्षांपासून तिच्या वडिलांकडे राहत होती. टीआयएसएस जदौनने सांगितले की, जिल्हा हॉस्पिटलमध्ये मुलीचे मेडिकल आणि उपचार केल्यानंतर तिला आईकडे सोपविले आहे. 

 

मुलगी रडत होती, पण नराधमाच्या वजनामुळे रडण्याचा आवाजही आला नाही 
पीडितेच्या आईने आमच्याशी बोलताना सांगितले की, मी माझ्या मुलीला दुपारचे जेवण हाताने भरवले. जेवण केल्यानंतर तिला झोप आली, मी तिला झोपले. तिला चांगली झोप लागली. माझा हैवान मामा एका कोप-या बसून माझ्या मुलीला वारंवार बघडत होता. सव्वा तीन वाजता मुलगी उठली, तिला भूक लागली होती. ती म्हणाली मला कुरकुरे हवे आहेत. मी लवकरच किराणा दुकानात गेली. पाच ते सात मिनिटात मी परत आले तर माझा श्वास थांबला. माझा मामा माझ्या मुलीसोबत अत्याचार करत होता. मुलगी रडत होती. त्याच्या वजनामुळे तिच्या रडण्याचाही आवाज येत नव्हता. कमरेच्या खालच्या भागातून रक्त येत असल्याचे दिसले तर मला थक्का बसला. मी त्या नराधमाला खुप मारले. नंतर मुलीला कडेवर घेऊन बाहेर पळाले.
"मी माझ्या लेकीला क्लॉथ मार्केटच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तिथून एमवाय येथे पाठवले. मी टॅक्सने मुलीला एमवाय येथे घेऊन गेले. मुलीची रडून-रडून वाईट अवस्था झाली होती. मुलीला बघून टॅक्सी वाल्यालाही वाईट वाटत होते. एमवाय येथे पोहोचल्यानंतर मी कॅजुअल्टीमध्ये गेले. तर डॉक्टरांनी तिला महिला वार्डमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. तिकडे गेले तर पुन्हा कॅजुअल्टीमध्ये पाठवले. तिथेही मला त्रास झाला. नंतर मी छत्रीपुरा ठाण्यात पोहोचले. ठाण्यामध्ये गेल्यावर पोलिस मुलीला घेऊन जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेले. दुपारी साडे तीन ते साडेपाच पर्यंत मी भरकटत राहिले. दोन तास माझी फुलासारखी मुलगी रडत होती. तिला भूक लागली होती. पण वेदनांमुळे ती सर्व विसरली. ती पाणीही पित नव्हती. तिला प्रचंड वेदना होत होत्या."

 

बातम्या आणखी आहेत...