आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना अपघात; वाळुच्या ढिगाऱ्याकाली अडकून दोन तरुणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- नदीपात्रातील वाळू ट्रॅक्टरमध्ये भरत असतांना अचानक वाळूचे ढिगार कोसळल्याने ढिगाऱ्याखाली येऊन दोन तरुणांचा गुदमरून  मृत्यू झाला आहे. घटना शनिवारी(ता. 23) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ शिवारात घडली. 

 

योगेश कोंडीबा तराळ(वय 18) आणि अनिकेत विक्रम तराळ(वय 17) दोघेही (रा. गोकुळ, ता. भोकरदन) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केळणा नदी पात्रामध्ये रात्रीच्या वेळी वाळूचे ट्रॅक्टर भरत असतांना वाळूचा ढिगारा अचानक खचल्याने दोन्ही तरूण या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. या घटनेनंतर येथे असलेल्या अन्य दोघांना ते दबल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना बोलावले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी नदी पात्राकडे धाव घेऊन त्यांचा शोध घेतला. त्यांना ढिगाऱ्याखालून काढून तत्काळ भोकरदन ग्रामीण रूग्णालयात आणले मात्र, येथे पोहचण्यापुर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, रविवारी सकाळी दोघांवरही एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
दरम्यान या घटनेत मयत झालेला अनिकेतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर योगेश हा अकरावीत शिकत होता. या कोवळ्या वयात त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...