आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर-दुचाकीचा अपघात; २ तरुणांचा जागीच मृत्यू, इगतपुरीमध्ये घडली घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर राज्यमार्गावर गुरुवारी १२ वाजेच्या सुमारास टँकर व दुचाकीत समोरासमोर अपघात होऊन दोन दुचाकीस्वार ठार झाले. घोटीहून सिन्नरकडे डांबर घेऊन टँकर जात होता. शेणीत शिवारातील कोथुळे पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारी दुचाकी व टँकरची धडक झाली. यात दुचाकी १ किमी अंतर टँकरसोबतच घसरत गेली. यात रामनाथ अगिवले (३०),  भाऊसाहेब अगिवले (३५, धामणी) हे जागीच ठार झाले, तर दुचाकीस्वार एक लहान मुलगा जखमी झाला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.