आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीनएजर बहिणींनी स्वच्छ पाणी पोहचवण्यासाठी जमा केले 10 कोटी रूपये, ओरिगामी वस्तू विकून गोळा केली इतकी मोठी रक्कम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- जर तुम्हाला काही चांगले काम करायचे असेल, तर हे महत्त्वाचे नाहीये की, तुमचे वय काय आहे? गरज आहे की, दृध निश्चयाची. हे सिद्ध करून दाखवले आहे अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या दोन टीनएजर बहिणींनी. या दोन बहिणींच्या प्रयत्नांमुळे हजारो लोकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.


टेक्सासच्या डलासमध्ये राहणारी 15 वर्षीय इसाबेल आणि 12 वर्षीय कथरीन एडम्सला पेपर फोल्ड करण्याची जापानी कला ओरिगामीचा छंद आहे. या दोघींनी आपल्या याच छंदाचा उपयोग जगातील हजारो लोकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी केला. त्यांनी पेपर फॉर वॉटर नावाची संस्था बनवून ओरिगामी वस्तुंना विकून 10 कोटी रूपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा केली. 


त्यांनी ओरिगामी दागिणे आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या
2012 मध्ये इसाबेल आणि कॅथरीन जेव्हा आठ आणि पाच वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांना कळाले की, विकसनशील देशातील महिला फक्त यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, कारण त्यांनार रोज स्वच्छ पाणी आणण्यासाठी दुरवर जावे लागले. अनेकवेळा पाणी आणण्यासाठी त्यांना अख्खा दिवस लागतो. ही माहिती त्यांच्यासाठी चकित करणारी होती आणि त्यातूनच त्यांना महिलांसाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली.


त्यानंतर दोघींनी ओरिगामी दागिने आणि सजावटी सामान बनवण्याचे ठरवले. कागदापासून बनवलेले हे दागिणे या इतक्या मोठ्या समस्य़ेला संपवण्यासाठी खूप कमी होते. पण त्या दोघांनी मेहनत करून काही वर्षातच 10 कोटी रूपयांचे गोळा केले. त्यानंतर या पैशांना त्यांनी 17 देशातील 170 जल परियोजनांच्या मदतीसाठी दान केले.

बातम्या आणखी आहेत...