आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू झालाय. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दुपारपासून अग्निशमन दलाचे जवानांकडून या तरुणांचा शोध सुरू आहे, पण चार तास उलटूनही त्यांचा पत्ता लाग नाहीये. बुडालेल्या तरुणांपैकी एकाचे नाव जावेद शेख असून तो ड्रायव्हर आहे.
विशेष म्हणजे आज समुद्रात भरती आहे. दुपारी समुद्रात एक मुलगा बुडत होता, तेव्हा पोहता येत असलेल्या जावेदने त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्याला वाचवण्यात जावेदला यशही आले, पण एक मोठी लाट आली आणि दोघांनाही आत घेऊन गेली. या लाटेमुळे दोघेही वेगवेगळे झाले. हे दोघे बुडताना पाहून पोलिसांनी जावेदच्या दिशेने दोरी टाकली, ती दोरी जावेदने पकडली, पण पुन्हा लाट आली आणि दोरी सुटली. त्यामुळे जावेद लाटेसोबत वाहून गेला.
या घटनेनंतर कोस्ट गार्ड आणि अग्निशमन दलाने तातडीने शोधकार्य सुरू केले. कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्यांना कुठेही हे दोन्ही तरुण आढळले नाहीत. जावेद हा पट्टीचा पोहणारा आहे, पण तरीही त्याला मोठ्या लाटेने ओढून नेले. वेगवेगळ्या यंत्रणा सध्या शोधमोहीम करत आहेत, पण चार तासानंतरही त्यांना यश आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.