आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसशी संबंध असल्यावरून हैदराबादमध्ये २ युवक अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- अतिरेकी संघटना आयएसआयएसशी संबंधांच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएने हैदराबादमधून दोन युवकांना अटक केली. त्यांची नावे मोहंमद अब्दुल्ला बासीत(२४) व मोहंमद अब्दुल कादीर(१९) आहेत. दोघे जण स्थानिक मुस्लिम युवकांना आयएसआयएसच्या वतीने देशातील अतिरेकी हल्ल्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप आहे. 


एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, कटाचा तपास व भारतात आयएसआयएस विचाराला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या हालचालींबाबत त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्या ताब्यातून काही संशयास्पद सामग्रीही जप्त केली आहे. आयएसशी संबंधित काही जण भारतात अतिरेकी हल्ल्यांसाठी भारतीय मुस्लिम युवकांना चिथावणी देतात व प्रशिक्षणही देतात. एनआयए २०१६ पासून अशा प्रकरणाची चौकशी करत आहे. अटक केलेल्या दोन युवकांनी गुन्हा मान्य केल्यानंतर सात वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...