आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राची ईको सिस्टीम वाचवण्यासाठी तरूणांनी केला अनोखा उपक्रम, उघडली पहिली कोरल फर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ तापमानावरच नाही तर समुद्रातील प्रवाळ खडकवरसुद्धा होत आहे. मागील 30 वर्षांमध्ये जगातील निम्यापेक्षा अधिक प्रवाळ खडकाचा प्रदूषणामुळे नाश झाला आहे. त्यामुळे आता जगासमोर समुद्राच्या परिसंस्थेला वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यासाठी अमेरिकेतील दोन उद्योजकांनी या दिशने पाऊल ठेवले आहे. या उद्योजकांचे नाव सॅम टिचर आणि गॅटोर हाल्पर्न असून त्यांनी कॅरेबीयन बेटावरील बहामासमध्ये जगातील पहिले व्यवसायिक कोरल रिफ फर्म उघडले आहे. 

 

टिचर आणि हाल्पर्न यांनी अमेरिकेतील 'येल स्कूल ऑफ फॉरेस्टरी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीजमधून' शिक्षण घेतले आहे. त्यांना या प्रयोगाची कल्पना मॉरिशसमध्ये एका प्रोजेक्टमध्ये काम करताना आली होती. यादरम्यान त्यांना आढळले की, प्रवाळ खडक नष्ट होत असल्यामुळे समुद्राचे पर्यावरण बिघडत असून मासे मरत आहेत. त्यामुळे दोघांनी मिळून कोरल विटा नावाने एक स्टार्टअप सुरू केले. सध्या ते कोरल रीफ एका पाण्याच्या टाकीत उगवून समुद्रात सोडत आहेत. तसेच, जगभरातील समुद्रामध्ये रिफची निर्मिती करून वातावरणातील परिवर्तनाचे दुष्पपरिणाम समजणे असा त्यांचा उद्देश आहे. टिचर आणि हाल्पर्न यांनी मागील महिन्यातच 14 कोटी रूपये खर्च करून बहामासमध्ये एक कोरल रिफ फर्म उघडला आहे.

 

मायक्रोफ्रेगमेंटेशन तंत्रज्ञानाचा उपयोग
ही कोरल रिफ्स बनवण्यासाठी मायक्रोफ्रेगमेंटशन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. यासाठी समुद्रातील प्रवाळ खडक घेऊन त्याचे छोटे छोटे भाग केले जातात. त्यामुळे जमीनवर निर्माण केलेल्या पाणीच्या टाकीत हे खडक 50 पटीने वाढते. त्यानंतर या रिफ्स परत समुद्रात सोडले जातात. 


2050 पर्यंत जगातील प्रवाळ खडक नष्ट होईल 
समुद्राचे तापमान वाढल्यानंतर हा प्रवाळ खडक नष्ट होतो. त्यामुळे याला कोरल ब्लिचींग असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध असलेली ग्रेट बॅरिअर जवळपास निम्याहू अधिक नष्ट झाली आहे. तसेच, अमेरिकी नॅशनल ओशिनिक अँड अॅटमॉस्पेरिक अडमिनीस्ट्रेशननुसार, 2050 पर्यंत जगातील सर्व कोरल रिफ्स संपुष्टात येतील असे सांगण्यात आले आहे.