आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Youths Came To Meet Girlfriend, Villagers Forced For Married Together In Bihar

दोन सख्ख्या बहिणींना भेटण्यासाठी 248 किमी दूर येत होते प्रियकर, ग्रामस्थांनी पकडून लावून दिले लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधेपुरा (बिहार) - येथे ग्रामस्थांनी दोन सख्ख्या बहिणींना भेटण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना पकडून त्यांचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. ही बाब दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना कळताच एकाच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये मुलाचे अपहरण करून त्याचे जबरदस्तीने लग्न केल्याची तक्रार दाखल केली. तर दुसऱ्या तरुणाच्या वडिलांनी विधिवत हिंदू रीति-रिवाजानुसार सुनेचा स्वीकार केला. 

 

दोन्ही तरुण पाटण्यात घेत आहेत शिक्षण 
मधेपुरा जिल्ह्यातील भीरखी येथील रोहन कुमार आणि जानकीनगर येथील वैभव दोघेही पाटण्यात एकाच खोलीत राहत होते. तेथे ते इंटरमीडिएटची तयारी करत होते. जयपालपट्टी हे रोहनचे आजोळ आहे. यामुळे त्याला तेथील रियासोबत प्रेम झाले. भानुने देखील रोहनच्या सहाय्याने रियाची बहिण चंदाला आपल्या प्रेमात अडकवले. 

 

पाटण्याहून रात्री मधेपुरात येत होते दोघे तरुण
दोघांवर प्रेमाचे भूत इतके चढले होते की, दोघेही जण रात्री पाटण्याहून कोसी एक्सप्रेसने मधेपुराला येत होते आणि आपल्या प्रेयसींना भेटून पाटण्याला परतत होते. दोघेही 25, 27 आणि 31 मे रोजी पाटण्याहून मधेपुराला आले होते. 31 मे च्या रात्री दोन्ही तरुणांनी मुलींच्या घरात प्रवेश करताच ग्रामस्थांनी चहुबाजूने घराला घेरले. अगोदर तरुणांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना लग्नासाठी मनवण्यात आले. अखेर दोन्ही जोडप्याचे शेजारील मंदिरात लग्न लावून दिले. 

 

प्रियकरांना भेटण्यासाठी प्रेयसी आजोबांना देत होती झोपेच्या गोळ्या
युवकाच्या वडिलांनी सांगितले की, प्रेयसीचा पिता पिकू यादव गुन्हेगार असून तो अद्याप फरार आहे. घरात फक्त आजोबा आणि दोन्ही बहिणी राहतात. दोन्ही प्रियकारांचा येण्याची माहिती मोबाइलवर मिळाल्यानंतर प्रेयसी आजोबांना झोपेच्या गोळ्या देत होती. जेणेकरून त्यांना प्रियकरांना भेटता येईल. 

 

प्रकरणाची चौकशी करूनच दाखल होईल गुन्हा
लग्नाची माहिती मिळताच रोहनच्या वडील देवानंद यादव यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये सुचना दिली. ते म्हणाले की, पाटण्यात शिक्षण घेणाऱ्या त्याच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पिकू यादवने त्याचे जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. पोलिस स्टेशन प्रमुख सुरेश कुमार राम यांनी सांगितले की, देवानंद यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.