आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक व कारच्या भीषण अपघातात राजस्थानातील दोन युवक ठार, नागपूर-जालना महामार्गावरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिबी-भरधाव जाणाऱ्या ट्रक व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील राजस्थानचे दोन जण ठार झाले आहेत. ही घटना नागपूर-जालना महामार्गावरील बिबी येथून जवळच असलेल्या जांभळीच्या नाल्याजवळ खापरखेड घुले शिवारात शुक्रवार १९ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. 

 

नागपूर-जालना महामार्गावरील जांभळीच्या नाल्याजवळ एम एच ३८ - डी ०६६४ या क्रमांकाचा ट्रक व आरजे १४ - एसी ४५५८ या क्रमांकाच्या कारची समोरासमोर धडक होऊन मारुती स्विफ्टमधील राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील डीडवाना तालुक्यातील जेवलीया बास या गावचे श्रवणकुमार राम गुजर व विनोद पारीक हे दोन युवक जागीच ठार झाले आहेत. 

 

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक चालक शेख अलिम शेख इब्राहिम (रा. यवतमाळ) यास अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेची तक्रार येथील पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुदास महाडिक यांनी केली आहे. पुढील तपास एपीआय सचिन यादव यांचे मार्गदर्शनाखाली महाडिक, शेख असिफ व शे. इरफान करीत आहेत.