Home | Business | Gadget | typewriter-computer-typing

आता वापरा कॉम्प्यु-टाइपरायटर

दिव्य मराठी टीम | Update - May 20, 2011, 03:12 PM IST

टाइपरायटर वापरलेल्या, टाइपरायटर आवडणाऱया सर्वांसाठी खुशखबर.

  • typewriter-computer-typing

    लंडन - टाइपरायटर वापरलेल्या, टाइपरायटर आवडणाऱया सर्वांसाठी खुशखबर. आता संगणकाला जोडता येऊ शकणारा अनोखे यूएसबी किट एका अमेरिकन आंत्रप्रेन्युरने विकसित केले आहे. या किटचा वापर करून आपण एकाच वेळी संगणक आणि टाइपरायटरवर टाइपिंग करण्याचा आनंद घेऊ शकतो. रिमिक्सच्या या जमान्यात संगणकातील हे रीमिक्स टाइपरायटर शौकिनांना आवडेल.

    टाइपरायटरची एकेकाळी जबरदस्त क्रेझ होती. टायपिंग करणाऱयास नोकरी मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे जागोजागी टायपिंग इन्स्टिट्यूटचे अक्षरश: पेव फुटले होते. मॅन्युअल टायपिंगच्या जागी इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर आल्यानंतरही टाइपरायटरचे महत्त्व टिकून होते, पण संगणकाचे आगमन झाले. संगणकाच्या बहुविध उपयोगामुळे ते प्रचंड लोकप्रिय ठरले. संगणकाचा झपाटाच असा की, आज टाइपरायटर रोजच्या जीवनातून हद्दपार झालेत, परंतु नव्या यूएसबी किटमुळे अडगळीत पडलेल्या टाइपरायटर प्रकाराला संजीवनी मिळाली आहे. हा यूएसबी किट सेंसर बोर्डाच्या साहाय्याने आपल्या पीसीच्या मॉनिटर, लॅपटॉप अथवा आयपॉडला जोडता येऊ शकेल.

    यूएसबी किटचा शोध लावणारे जॅक झाल्कीन म्हणतात, अडगळीत पडलेल्या एखाद्या गोष्टीच्या दृष्टीने हा नवा, क्रांतिकारी शोध आहे.
    संगणकाला जोडण्यासाठी यामध्ये गुंतागुंतीची वायरिंग नाही, की यामुळे टाइपरायटरचा लूकही बदलत नाही.फक्त अडॉप्टर तेवढे लागते. तेही मॉनिटरच्या मागे अथवा साईडला लावता येते.

Trending