आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडाच्या रस्त्यांवर लावण्यात येणार 'टायर किलर्स', राँग साईडने गाडी चालवणे पडणार महागात; चुकीच्या दिशेने गाडी चालवताच टायर होणार पंक्चर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : अनेक वेळा वाहनधारक घाईघाईत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या दिशेने वाहने चालवितात. पण आता चुकीच्या दिशेने गाडी चालवणे महागात पडणार आहे. कारण पोलिस आणि परिवहन विभागाने तशी व्यवस्थाच करण्याची योजना आखली आहे. आता चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांसाठी रस्त्यावर 'टायर किलर्स' लावण्यात येणार आहेत. या टायर किलर्सची एक विशेष बाब आहे. योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हे टायर किलर्स एका स्पीड ब्रेकरचे काम करणार आहे. तर चुकीच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे टायर्स यावर पडताच पंक्चर होणार आहे.  


या पाच ठिकाणी लावण्यात येणार टायर किलर्स

नोएडामध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच ठिकाणी हे किलर टायर्स लावण्यात येणार आहे. यामध्ये नोएडा सेक्टर-76, सेक्टर-74 मधील चौक, सेक्टर-77 येथील जंक्शन, होशियारपूरचा यू-टर्न, सेक्टर-61 येथील साई मंदिराजवळील यू-टर्न आणि सेक्टर-75 मेट्रो स्टेशनजवळ हे टायर किलर्स बसविण्यात येणार आहेत. 


नोएडामध्ये चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण जास्त 

याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, नोएडामध्ये बहुतांश लोक चुकीच्या दिशेने गाडी चालवताना पकडले गेले आहेत. 500 मीटर अंतराव योग्य वळण असूनही घाईघाईत लोक नियमांचे उल्लंघन करतात. यामध्ये दुचाकी वाहनांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. 

पुण्यातही लावण्यात आले होते टायर किलर्स

 

महाराष्ट्रातील पुणे शहरातही लावण्यात आले होते टायर किलर्स 

तेथेही चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांसाठी रस्त्यावर 'टायर किलर्स' लावले होते. येथील टायर किलर्सचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...