आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीसाठी टायझर ब्रँडची नावीन्यपूर्ण ‘कम्फी स्ट्रेच’ श्रेणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टायझर ब्रँडने दिवाळीनिमित्त “कम्फी स्ट्रेच’ शर्टची नवीन श्रेणी सादर केली आहे. वळताना, वाकताना, टर्न किंवा ट्विस्ट होताना हे शर्ट्स  खांदे, हात, कोपरे, पोट किंवा पाठीच्या जागी स्ट्रेच तर होतातच, त्याचबरोबर अतिशय आरामदायी अनुभवही देतात. म्हणूनच कम्फी स्ट्रेच श्रेणीतील सर्व कपडे कम्फर्टेबल आणि स्ट्रेचेबल आहेत. तरुणाईला आवडणाऱ्या स्लीम फिटमधील या शर्ट््समध्ये इंटेलिस्ट्रेच आहे तसेच हे शर्ट अत्यंत स्टायलिश असून दिवाळीसाठी फ्रेश कलर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकल्पनेबाबत टायझरचे संचालक कुणाल मराठे म्हणाले की, “आजच्या तरुणांना कशाही कॉम्प्रमाइज करायला आवडत नाही. मात्र, स्टायलिश कपडे आकर्षक असूनही कम्फर्टेबल नसल्यामुळे त्यांना कॉम्प्रमाइज करावे लागते. त्यामुळेच टायझरने कम्फी स्ट्रेच या संकल्पनेतील शर्ट्स  सादर केले आहेत.  सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, स्टायलिश लूक आणि योग्य किंमत ही टायझरची वैशिष्ट्ये कम्फी स्ट्रेचमध्येदेखील आहे. या शर्टची किंमत केवळ ८९५ रुपये असून टायझरची एक वर्षांची गॅरंटीही देण्यात आली आहे.  


या श्रेणीत शर्टशिवाय टाऊझर्सही उपलब्ध असून यात पायांना आणि कमरेलाही स्ट्रेच मिळतो. याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शुभारंभाच्या गेल्या पहिल्या वर्षातच टायझरने पाच लाखांहून अधिक कपड्यांची विक्री केली आहे. एकाच वर्षात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर इ. शहरांमध्ये ५० शोरूम्स ग्राहकांचे प्रेम अनुभवत आहे. तसेच सर्व ५० शोरूममधून ग्राहकांना एक्स्चेंजची सुविधा उपलब्ध आहे. पुढील काळात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत हा ब्रँड पोहोचवून शोरूमची संख्या १०० करणे हे उद्दिष्ट असल्याचेही मराठे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...